The Newz Biz Team, PUNE
पिंपरी चिंचवड शहारत अनेक समस्या आहेत. त्यात पर्यावरणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरात अनेकजण उच्चशिक्षित आहेत, आयटी क्षेत्रात कामाला आहेत. अनेकांकडे कॉम्पुटर आणि मोबाईल आहेत. पण काही कालांतराने ते बंद पडतात, अशावेळी हा ई-कचरा कुठे जमा करायचा, हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
सध्या गणेशउत्सव सुरु आहे. हौशी मंडळींनी सजावटीसाठी जुन्या लाईटच्या माळा, त्याचे चार्जर, चोक, ड्राइव्हर इत्यादी वापरले, तर त्यातले काही खराब झाले. त्यांचाही हा प्रश्न आहे की या खराब आणि न वापरता येणाऱ्या ई-कचऱ्याची विल्ल्हेवाट कशी लावायची.
एवढेच काय पण घरातली ट्यूब लाईट खराब झाली, तर त्याचे काय करायचे ? हा प्रश्न कित्येक दिवस नागरिकांना पडलेला आहे.
ई-कचरा साफ-सफाई करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक असतो. ई-कचऱ्यामुळे कचरा डेपोमध्ये आगी लागण्याचा धोका असतो. काही सामाजिक संस्था ई-कचरा गोळा करण्याचे छोटे मोठे उपक्रम घेत असतात; पण ते ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.
राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव धनवे-पाटील यांनी शहरातील निर्माण होणार ई-कचरा कुठे जमा करायचा, त्याची विल्ल्हेवाट कशी लावायची, याबाबत प्रशासनाकडून योग्य ती पाऊले उचलली जावीत. यासाठी महापालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांना निवेदन दिले. त्या उपाय योजनांचा प्रचार प्रसार करावा ही विनंती केली आहे.








Leave a Review