बँकेच्या योजनांचा लाभ घ्या : बबनराव भेगडे

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून पुणे पीपल्स बँकेचे कामकाज चालू आहे.व्यवस्थापन समितीने सभासद हितास प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात बँकेने आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. बँकेत विविध आकर्षक योजना आहेत. सभासदांनी बँकेच्या या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक बबनराव भेगडे यांनी केले.

पुणे पीपल्स बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा बाविसावा वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत बँकेचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना बबनराव भेगडे बोलत होते. बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष कृष्णा
कारके उपस्थित होते. यावेळी सरव्यवस्थापक सदानंद दीक्षित, असिस्टंट जनरल मॅनेजर संजय जाधवर, शाखा व्यवस्थापक अजय शेठ, निवडक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सभासदांना प्रातिनिधिक स्वरुपात मास्क, सॅनिटायझर व बँकेच्या नावाच्या बॅगेचे वाटप करण्यात आले.

बबनराव भेगडे म्हणाले, सन २००० साली बँकेची तळेगाव दाभाडे शाखा सुरू झाली. बँकेची शाखा तळेगावात सुरू व्हावी, यासाठी तत्कालीन संचालक बाळासाहेब किबे व शाखाधिकारी अजित कवळेकर यांनी मोलाचे परिश्रम घेतले होते. त्यांची आजही आठवण येत आहे. तळेगाव दाभाडे शाखेच्या ठेवी ४० कोटी, कर्ज वाटप १३५ कोटी तर ५ कोटी ४६ लाखांचा निव्वळ नफा आहे. ३१मार्च अखेर बँकेने १७३कोटी रुपयांचा व्यवसाय दिला आहे. बँकेचे टीम वर्क चांगले आहे.

जनादर्न रणदिवे म्हणाले, तळेगाव दाभाडे शाखेची कामगिरी चांगली आहे. यामध्ये स्थानिक संचालक बबनराव भेगडे आणि बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी
यांचे योगदान आहे.

बँकेचे संचालक बबनराव भेगडे यांनी तळेगाव व चाकण या दोन्ही औद्योगिक वसाहतींचा विचार करून तेथील कामगारांच्या घराचा प्रश्न हाती घेतला होता. तेथील अनेक नामवंत कंपन्यांशी करार करून कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. यामधून पुणे पीपल्स बँकेच्या अर्थसहाय्याने २ हजार कामगारांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. वसंत पंचमीच्या सुमुहूर्तावर १९५२ झाली पुणे पीपल्स बँकेची स्थापना झाली. गेली ६८ वर्षे बँकेचे कामकाज चालू असून, तिला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त आहे. मागील सलग तीन वर्षे बँकेला लेखा परीक्षणाचा
‘अ’ वर्ग मिळाला आहे.

बँकेच्या पुणे व परिसरात २१ शाखा, आळंदीत विस्तारीत कक्ष व ठाणे आणि बेळगावात प्रत्येकी एक शाखा कार्यरत आहे. सुमारे १ हजार २५२ कोटींच्या ठेवी असून बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.९० टक्के आहे. आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय २०१९.७१ कोटी असून, यामध्ये
ठेवी १२५१.६४ कोटी व कर्जे ७६८.०७ कोटी यांचा समावेश आहे. १५ कोटी ४० लाख रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना १२ टक्के दराने लाभांश देण्यात आला आहे.

सूत्रसंचालन संजय जाधवर यांनी केले. अजय शेठ यांनी आभार मानले.


Share this Newz