एलएसएटी-इंडिया ची परीक्षा २९ मे २०२१ पासून सुरु होणार

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे एलएसएसी ग्लोबलने २०२१ सालची जून महिन्यात होणार असलेली एलएसएटी – इंडिया ही परीक्षा २९ मे २०२१ पासून वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये घेण्याचे ठरवले असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखेमध्ये बदल केला गेल्यामुळे एलएसएटी – इंडियासाठीची नोंदणी १४ मे २०२१ पर्यंत करता येईल. 

 

जेव्हा समस्या अभूतपूर्व आणि विलक्षण असतात तेव्हा त्यावरील उपाययोजना देखील अभूतपूर्व असणे गरजेचे असते. गेल्या वर्षी कोविड-१९ महामारीची सुरुवात झाल्यापासून एलएसएटी-इंडिया परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स-असिस्टेड रिमोट प्रॉक्टरिंगचा वापर करून परीक्षेत प्रामाणिकपणा आणि वैधता यांचे पुरेपूर पालन केले जात आहे यावर लक्ष ठेवले जाते. या पद्धतीमुळे विद्यार्थी त्यांच्या घरून अगदी सुरक्षित आणि सोयीस्करपणे परीक्षा देऊ शकतात आणि विधी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये काहीही व्यत्यय येत नाही.

एलएसएसीचे उपाध्यक्ष युसूफ अब्दुल-करीम यांनी सांगितले की, आम्हाला ठाऊक आहे परीक्षेची तारीख अलीकडे घेतल्याने विद्यार्थ्यांचा तयारीसाठी उपलब्ध असलेला वेळ कमी झाला आहे.  पण त्यांना परीक्षेची तयारी करण्यात मदत करणारी ऑनलाईन टूल्स आम्ही उपलब्ध करवून दिलेली आहेत.

 

भारतातील अनेक मोठी विधी महाविद्यालयांमध्ये एलएसएटी – इंडिया ही परीक्षा त्यांच्या विधी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा मानली जाते.  एलएसएटी – इंडिया या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना फक्त एक परीक्षा देऊन भारतातील अनेक मोठ्या विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतात.  त्यामुळे जास्तीत जास्त संधींचा लाभ घेऊन, वेळ, ताण आणि पैसे यांची बचत करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एलएसएटी – इंडिया अतिशय उपयुक्त आणि सोयीस्कर आहे.  एलएसएटी – इंडिया हा प्रवेशाच्या प्रमुख निकषांपैकी एक असल्याचे ज्यांनी स्वीकारले आहे अशा महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा – https://www.discoverlaw.in/associated-law-college.


Share this Newz