प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदी उठवण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश

Share this Newz

भल्ला यांनी राज्यांना अनलॉक ३ नियमावलीचा संदर्भही दिला आहे. अनलॉक-३ नियमावलीतील पाचव्या परिच्छेदाचा उल्लेख करत म्हटले आहे की, “प्रवासी आणि माल वाहतुकीवर कोणतीही बंधने असणार नाहीत. त्याचबरोबर शेजारील देशांशी करारानुसार सीमापार व्यापार करण्यासाठीही स्वतंत्र परवानगी व ई-परमिटची गरज भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लॉकडाउनच्या तीन टप्प्यानंतर अनलॉक घोषित करण्यात आला असून, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जात आहे. राज्यांतर्गत आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदी उठवण्याचे केंद्राने राज्यांना निर्देश दिले आहेत.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे की, “केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले आहे. राज्यातंर्गत वा राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको,” असे स्पष्ट केले आहे.

“राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतुकीवर लादण्यात आलेल्या बंधनाचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरील मालाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवरही झाला आहे. विस्कळीत व्यवहारांच्या परिणामुळेच बेरोजगारी देखील वाढत आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.