महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सव्वासहा लाखांच्या वर

TheNewzBiz Team, मुंबई :
Share this Newz

महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या 6,28,642 झाली आहे. बुधवारी 13,165 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,60,413 रुग्णांवर उपचार सुरू असून, 4,46,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाईट बाब म्हणजे, 21,033 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या (दि. २०) ऑगस्ट पासून सुरु होत असून, त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.

65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.


Share this Newz