अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share this Newz

 

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :       पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील शैक्षणिक व संशोधन समन्वय समितीच्या माध्यमातून, अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक व शेतीविषयक संशोधनपर २०० प्रोजेक्ट सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाचे मा. प्राचार्यांनी कौतुक केले. बहिस्थ परिक्षकांमार्फत सादर संशोधन प्रकल्पाचे परिक्षण केले.

पदवी विभागात पुर्वा पात्रे, मयुरी खर्चे, विजय यादव, विशाल दिलपाके, वैभव ढगे, आदित्य मोईली, सोनाली म्हेत्रे, संस्कृती सुपनर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर हर्षदा महाजन, खुशी चौधरी, निकिता सालगुडे , साक्षी ढमाळ, विशाखाबमाने, गुरुप्रसाद दिनगरे, कोमल थिटे, वैष्णवी शरणार्थी, तुषार सांगळे, भाग्यश्री राऊत, अंकिता महानवर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पाला द्वितीय क्रमांक पटकावला.
पदव्युत्तर विभागामध्ये वर्षा विद्याधर , यजाज शेख सोनाली म्हेत्रे, ऋतिका काळभोर, चंदनकुमार बिंड प्रथम क्रमांक तसेच विद्यावाचस्पती विभागातून मधुमंजिरी ओक, गणेश ढगे, महादेव पारेकर यांनी प्रथम तर वर्षा घाडगे , सोनाली कांबळे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. तर शिक्षक विभागातून विशाल झेंडे आणि प्राजक्ता बनकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाले.

र्कार्यक्रमाचे संयोजन समन्वयक डॉ. सुनिता दानाई-तांभाळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरद गिरमकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किरण रणदिवे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. अण्णासाहेब निंबाळकर, प्रा. एस.एल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


Share this Newz