अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये श्रीं’ची ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :    जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना संस्थेचे सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आली. संस्थेने यंदा चांद्रयान 3 च्या संकल्पनेवर आधारित गणपतीची सजावट केली आहे.

यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फुलांच्या पायघड्या घालीत वाजत गाजत गणरायाची मूर्ती आणण्यात आली. संस्थेतील सर्व शिक्षकांनी गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत  आनंदी वातावरणात व भक्तीभावाने गणरायाचे स्वागत केले. गणपती  प्रतिष्ठापणेसाठी भटू शिंदे, उदय फडतरे यांनी नियोजन केले, तर कला शिक्षिका दर्शना बारी यांनी चांद्रयान 3 च्या संकल्पनेवर आधारित गणपतीची सजावट केली आहे.


Share this Newz