अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत शिक्षकदिन विविध उपक्रमांनी साजरा

Share this Newz

द न्यूज बिज टाईम्स,पिंपरी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. तसेच शाळेचे नियोजन उत्तमरित्या पार पडले.

प्रशालेत सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून विद्यार्थ्यांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाचे महत्त्व सांगत शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटिका सादर केली. यावेळी शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते, यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत खेळांचा आनंद लुटला. आरती राव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका नीलम सावंत, स्वाती तोडकर, सोनिया गुरुंग यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका सीमा हवालदार, विद्यार्थीनी सायली जोगी व अनुष्का भोसले यांनी, तर साक्षी जाधव, हर्षला गायकवाड यांनी आभार मानले.


Share this Newz