सरोवर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पिंपरी : आकुर्डी येथील सरोवर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. 
यावेळी पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा शहर अध्यक्ष शुभम वाल्हेकर, पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंह, सरोवर प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश मस्के, सागर अभिवंत, कुणाल भरम, प्रसाद बाविस्कर, आदित्य बाविस्कर, नितीन राजाने, रोहित पवार, आनंद झेंडे, जतींदर हंसपाल, अक्षय गायकवाड, नागेश सुतार, सोहेल शेख, शरद मांडरे, अक्षय कापसे, क्रिश गंगणे, अमोल नरवाडे, सोमेश्वर घायाळ, बालाजी मस्के आदी उपस्थित होते.
गजाननभाऊ चिंचवडे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व क्षेत्रात केलेली क्रांती उल्लेखनीय आहे. पुढच्या कित्येक पिढ्यांना त्याचा फायदा होणार आहे. बाबासाहेबांचे विचार सर्व समावेशक होते. बाबासाहेबांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आपले कार्य केले.
शुभम वाल्हेकर म्हणाले, की शैक्षणिक गुणवत्तेच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या देशामधील विद्यापीठामध्ये व परदेशातील विद्यापीठांमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलेले पहिले होते.
उमेश मस्के यांनी सांगितले, की बाबासाहेबांचा विचार आजच्या प्रत्येक युवकाने अंगीकारला पाहिजे.
कमलजीत सिंह म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आजच्या तरुण युवकाचे आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ म्हणून त्याची नोंद झाली आहे.


Share this Newz