द न्यूज बिझ टाईम्स, पिंपरी : वाढदिवस म्हटलं की आप्तेष्ट मंडळी,मित्र मैत्रीणी, केक कापणे गोडधोड ह्या गोष्टी घरगुती नित्याच्या झाल्या आहेत.यातच युवक मंडळींचा वाढदिवस म्हटलं की वायफळ खर्चाची पार्टी आलीच.मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जुनी सांगवी येथील कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक व सातारा मित्र मंडळ सांगवीचे अध्यक्ष शिवाजीराव माने व सविता माने यांची कन्या डॉ. प्रतिक्षा माने आणि सातारा मित्र मंडळ सांगवीचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण व माधुरी चव्हाण यांची कन्या रेणुका चव्हाण यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता प्रेरणा भवन सामाजिक प्रकल्प ताथवडेमधील १८० अपंग, मतिमंद, गतिमंद महिला व विध्यार्थी आणि ४० एच. आय. व्ही ग्रस्त विद्यार्थ्याना मदत केली.
लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी व डॉ. वैशाली दळवी यांच्या सहकार्याने या प्रेरणा भवन मधील समाजाने टाकलेल्या अशा व्यक्तींना आनंद देण्यासाठी त्यांच्यात सामील होऊन त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य मला मिळाले. माझे बाबा सातारा मित्र मंडळ व लायन क्लब पुणे रहटणीच्या माध्यमातुन नेहमीचं सामजिक कार्य करतं असतात त्यांचाच वारसा पूढे चालवण्यासाठी मी माझे सर्व वाढदिवसा अशाच लोकांच्या सानिध्यात साजरा करून त्यांना मदत करणार आहे असे डॉ. प्रतिक्षा माने म्हणल्या.
कोरोना काळातील लॉकडाऊनमधे प्रत्येक व्यक्तीला जिवनमानातील चढ उतार अनुभवावे लागले आहेत.याचाही परिणाम समाजमनावर झाला असून लग्न असो की वाढदिवसासारखे इतर समारंभ गाजावाजा न करता सत्कारणी लागावा याच धारणेतून डॉ.प्रतिक्षा हिने ताथवडे पुणे येथील प्रेरणा भवन मधील या सर्व बांधवांना स्नेहभोजन व लागणाऱ्या वस्तूंची मदत केली.याचबरोबर सर्व अपंग महिलांना व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आज या महिलांच्या व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप आनंद होत आहे.भविष्यातअशा महिलांसाठी व मुलांसाठी मी मोफत औषध उपचार करणारं आहे. असे त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ.प्रतिक्षा यांच्या या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी व तिला आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमात प्रेरणा भवनच्या सिस्टर रोशनी, सिस्टर फ्रान्सिस, सिस्टर स्टॅलिन लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी चे प्रेसिडेंट ला.धीरज कदम, एम्. जे.एफ.ला.वसंत भाऊ कोकणे, एम.जे.एफ.ला.धनराज मंघनानी, ला.अभिषेक मोहीते, ला.महेश दिवटे, ला.समीर अगरवाल, ला.प्रमोद भोंडे, कुटुंबाचे सदस्य आजी इंदुबाई माने, पुष्पा गायकवाड,भाऊ ला.अथर्व माने, श्रावणी गायकवाड, प्रेरणा भवन परिवारातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रेरणा भवन मधील सिस्टर रोशनी यांनी उत्समूर्ती ना आशीर्वाद दिले व उपस्थितांचे आभार मानले.
Leave a Review