द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : लष्करातील सैनिकांना अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. यावेळी त्यांची शारीरिक आणि मानसिक मशागत होते, त्यांच्या मन:स्थितीची कस लागतो. मात्र शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर राहून कामगिरी करण्याचे ध्येय सैनिकांसमोर असते. प्रशिक्षणातून मिळालेला शिस्तबद्ध आणि साचेबद्धपणा सैनिकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लष्कर देत असलेल्या प्रशिक्षणाचा, उच्चशिक्षणाचा आणि कौशल्याचा वापर औद्योगिक क्षेत्रात केला तर एसएमई क्षेत्राची भरभराट होईल असा विश्वास ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ चे संचालक आणि जनरल सचिव, महेश साळुंखे यांनी हॉटेल नुरया होमटेल येथे आयोजित एसएमई मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्स्पोर्ट समिट दरम्यान व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे यांनी शासनाच्या नविन योजना, लॉजिस्टिकस क्षेत्र, महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्र विषयक शासकीय धोरण आणि इनसेंटिव्ह सपोर्ट यावर सादरीकरण केले. यावेळी आदित्य बिर्ला सन लाईफचे एएमसी.चे आनंद सिंग, नॅशनल स्मॉल इंड.कॉर्प. अंकुर बोरठाकूर, निओ ग्रुपचे शिलादित्य चौधरी, रवींद्र तारपाडे, पुणे सेंट्रल रेल्वे, सहाय्यक डिव्हीजनल मटेरियल मॅनेजर आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्पादक आणि निर्यातदारांसाठी योजना आणि प्रोत्साहन, एसएमई वाढ आणि विस्तारासाठी बँक निधी आणि उत्पादन आणि एसएमई क्षेत्राच्या विकासात MSME मंत्रालयाची भूमिका या विषयांवर सकस चर्चा झाली. बाजाराचा दृष्टीकोन आणि गुंतवणुकीचे नियोजन, एसएमई मधील जोखीम कमी करणे, एसएमईसाठी रेल्वेमधील विक्रेता विकास प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन उपस्थितांना झाले. केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातून प्रेरीत होऊन एसएमई क्षेत्रातील उत्पादनाचा चालना देण्याचा सूर या समिट मध्ये उमटला. एसएमई मध्ये नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचा यांचा मिलाप असणारी धोरणे यांच्या समर्थनात एसएमई चेंबर ऑफ इंडिया कार्यरत आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक निधी, पायाभूत सुविधा आणि समर्थन प्रणालींमध्ये प्रवेश असावा अशी भूमिका ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ मांडत आली आहे.
या समिटचे केंद्रबिंदू ठरले आर्मीतील लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी. एसएमई क्षेत्राच्या भरभराटीसाठी लष्करातील सैनिक आणि दिग्गजांकडील कौशल्याचा फायदा कसा मिळू आदी बारकावे लष्करातील दिग्गजांनी केलेल्या सादरीकरणातून सांगण्यात आले. रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल जगभान सिंग, आर्मी वेलफेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (एडब्लूपीओ) यांनी लष्करातील सैनिक सुमारे १३५ उद्योगांमध्ये आपले योगदान देऊ शकतात हे नमूद केले. पुण्यामध्ये सुमारे २. ५ लाख ऑटो कॉम्पोनन्ट, मॅनुफॅक्टरर्स, इंजिनीरिंग, पॅकेजिंग, आयटी इंडस्ट्री आहेत. सध्यस्थितीत कॉर्पोरेटसाठी बाजार दृष्टिकोन आणि उपाययोजना वर आदित्य बिर्ला सन लाईफचे एएमसी.चे आनंद सिंग यांनी सादरीकरण केले.
Leave a Review