द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. रामकृष्ण मंगल कार्यालय चौक ते पिंपळे गुरव गावठाण दरम्यान बैलांची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बैलांना स्नान घालून, बाशिंग, फुगे, मणी-माळ, रंग यांनी सजवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पिंपळे गुरवकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बैलांचे जागोजागी पूजन करण्यात आले. मिरवणुकीत कदम, जांभुळकर, नवले, कवडे, काशिद देवकर, सांळुके, चव्हाण, जगताप परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, शांताराम जगताप, किसन जगताप, हनुमंत जगताप, दत्तात्रय जगताप, नरेश जगताप, सुमित जगताप, जनार्दन जगताप, रोहीदास जगताप,
पै. गणेश मधुकर काशिद, गणेश पोपट काशिद, प्रविण मोहिते, पै. हितेश जाधव, संकेत विधाते, प्रविण चव्हाण, अमित जगताप, राहुल चोथवे, पै. निखील जगताप, दिग्वीजय जगताप, प्रविण शिंदे, अभिषेक काशिद, बापू गांगार्डे, प्रसाद, अंकुश, अनिकेत खोत, अमोल जाधव, शार्दुल सुर्यवंशी, शुभम विधाते, हिमांशु जगताप, आयुष जगताप, कमलेश जगताप, सौरभ जगताप, शुभम पिंपळे, अजय केवट, परिमल क्षीरसागर, निलेश चव्हाण, प्रमोद निकाळजे, आलोक गिरमे, आकाश गायकवाड, तेजस मिरघे, हर्ष जाधव, सार्थक जगताप, निशांत फलके, शामभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर माजी कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की परंपरा, चालीरीतीनुसार लाडक्या बैलांची सजावट, पूजा आणि पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालून बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सखा असणाऱ्या बैलांच्या ऋणात राहण्यासाठी हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलजोडीची खांदामळणी केली व बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पिंपळे गुरवमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
Leave a Review