एम. के चौक पिंपळे गुरव-नवी सांगवी येथे दुर्गा देवी मंदिराचा जिर्णोद्धार व ओपन जिमचे उद्घाटन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :     नवी सांगवी येथील एम.के. चौकातील महाराष्ट्र महिला मंडळाच्या दुर्गा देवी मंदिराचा जिर्णोद्धार आणि मंदिरासमोरील दीपस्तंभ, तसेच परिसातील लहान थोर ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ‘ओपन जिम’चे उद्घाटन मंडळातील महिला व ज्येष्ठ नागरिक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महिला मंडळातील सुनंदाताई चव्हाण, सुलोचनाताई कवडे, द्वारकाताई कवडे, पार्वतीताई मोरे, उषाताई हसबे, उर्मिलाताई माने, सविताताई देसाई, जयश्रीताई यादव, वेदिकाताई माने, आशाराणीताई शिंदे, पुष्पाताई पाटील, स्वातीताई शिंदे, अनिताताई कवडे, कविताताई घाटगे, सोनालीताई चव्हाण, मनीषाताई मोरे, मोहिनीताई कांगणे, तसेच पांडुरंग घाडगे, राजेश साळुंखे, घाटगे काका, मनीष भापकर, माने काका, चंद्रकांत शिंदे, पाटील काका, रघुनाथ मुसळे, जाधव काका, कांगणे काका, वरघडे काका, आवरे काका, कालिदास ढोरे, सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनाथ जगताप म्हणाले, की नवरात्र हा महिलांच्या सबलीकरणाचा उत्सव असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात, हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी, हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो.

महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, व्यायाम करावा यासाठी सर्वांसाठी तसेच महिलांकरता ओपन जिम सुरू केली आहे. महिला नेहमीच आपले घर सांभाळताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर नोकरी करणाऱ्या महिला आपले काम करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. व्यायाम तसेच योगा करून निरोगी राहावे, असेही जगताप यांनी सांगितले.


Share this Newz