अपंगांना आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :    कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय किंवा हात निकामी झालेला. कुणी अपंगत्वच घेऊन जन्माला आलेलं. आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचे नशीब वाट्यास आलेले. मात्र अशा अवस्थेतही जगण्याची, काही मिळवण्याची जिद्द या अपंगांमध्ये आहे. अशा जिद्द बाळगणाऱ्या अपंगांचा आधार बनून त्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे सत्कर्म आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि त्यांचे बंधू भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी चालविले आहे. या सत्कर्मातूनच जगताप बंधूंनी शुक्रवारी (दि. २९) आयोजित शिबीरात ३१४ अपंगांच्या आयुष्यात आनंद फुलविला. त्यांना कृत्रिम हात व पायाचे (जयपूर फूट) तसेच व्हीलचेअर आणि ट्राय सायकलचे मोफत वाटप केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या पुढाकाराने चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने पिंपळेगुरवमध्ये हे शिबीर घेण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या शिबीराला शंकर जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंगोळकर, बाबा त्रिभुवन, माऊली जगताप, महेश जगताप, गोपाळ माळेकर, नवनाथ जांभुलकर, शिवाजी कदम, अमर आदियाल, विनोद तापकीर, योगेश चिंचवडे, शेखर चिंचवडे, संजय मराठे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे, निर्मला कुटे, उषा मुंढे, कोमल गौंडाळकर, राणी आदियाल, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

शिबीरात सहभागी अपंगांची तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करण्यात आली. कृत्रिम पाय किंवा बसवणे शक्य असेल त्यांच्या पायाचे मोजमाप करण्यात आले. त्यानुसार संबंधित अपंगांना जयपूर फूट बसवण्यात आले. शिबीरात ३१४ अपंगांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे सत्कर्म जगताप बंधूंनी केले. शिबीरात सहभागी १८६ अपंगांना जयफूर फूट मोफत बसवण्यात आले. त्याचप्रमाणे ८५ अपंगांना कॅलिपर्स, २८ अपंगांना व्हिलचेअर आणि १५ अपंगांना ट्राय सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, “अपंगत्व हे शरीराला आलेले असते. पण अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास भरला. त्यांना आधार दिला तर हे अपंगत्व मानसिक पातळीवर जात नाही. त्यासाठी समाजातील धडधाकट आणि आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्याच भवतालच्या अपंगांना आधार देण्याची गरज आहे. ही गरज ओळखून आमदार लक्ष्मणभाऊ जगताप गेल्या अनेक वर्षांपासून अपंगांना त्यांच्या पायावर उभे कारण्यासाठी जयपूर फूटचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहेत. मधल्या काळात कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे या उपक्रमामध्ये खंड पडला होता.

आता कोरोनाच्या संकटाला तोंड देऊन समाजजीवन पूर्वपदावर आलेले आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांना जयपूर फूटचे मोफत वाटप करण्यासाठी शिबीर घेण्यात आले. अपंगांसाठी अनेक शासकीय व आरोग्य योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी अपंगांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.


Share this Newz