अरविंद एज्युकेशन सोसायटीची 100 टक्के निकालाची परंपरा कायम; मुलींचीच बाजी

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :        माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या धनश्री पाटील हिने 94.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. श्रावणी कुंभार हिने 92.20 टक्के गुण मिळवत द्वितीय, नित्या चवरे हिने 91.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. तर श्रावणी कदम हिने 90.80 टक्के गुण मिळवत चौथा आणि श्रीनिवास कोरे याने 89.60 टक्के गुण मिळवत पाचवा, अनुष्का रामटेके हिने 89.40 टक्के गुण मिळवत सहावा क्रमांक पटकावला.


भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिने 92.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तन्मय बारवे याने 91.60 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर प्रणाली तेहरे हिने 90.60 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अपूर्वा देशमुख 88.80 टक्के व अंजली गुरव 88.80 टक्के गुण मिळवत संयुक्तपणे चौथा क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, भटू शिंदे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशात विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य, शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.


Share this Newz