सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांच्या हस्ते कराटे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :       वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेच्या वतीने कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली. असोसिएशनचे प्रमुख शिहान विक्रम मराठे यांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांच्या हस्ते बेल्ट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.


शालेय मुले आणि मुलींमध्ये स्वतःचे संरक्षण करण्याबाबत आत्मविश्वास, धाडस निर्माण व्हावे, यासाठी पिंपळे गुरव परिसरात कराटे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. यातून प्रशिक्षण घेतलेल्या मुला मुलींना कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी संसाय विक्रम मराठे, राजेंद्र कांबळे, नंदिनी ओझा, अश्विनी गांधी, तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल म्हणाले, की पिंपळे गुरव परिसरातील लहान मुले आणि मुली स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतील या उद्देशाने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे. साधारणत: 1990 पासून उद्योजक महेंद्रसिंग आदियाल यांनी आदियाल स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थी घडविले. आज तेच विद्यार्थी अनेक मुला मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन धाडसी बनवीत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. कराटेमुळे मुलांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे. विविध कराटे स्पर्धाँसाठी आवश्यक ती सर्व मदत आदियाल स्पोर्ट क्लबच्या वतीने करण्यात येते. इथून पुढेही गरजू प्रशिक्षणार्थिना मदत करण्यात येईल, असे आश्वासनही अमरसिंग आदियाल यांनी दिले.

उत्तीर्ण विद्यार्थी
– ब्ल्यू 1 बेल्ट : सम्यक कांबळे

– ग्रीन बेल्ट
युवराज मनोहर, मयंक कांबळे, समृद्धी राठोड, अनुष्का घनकुटे, हर्षला गायकवाड, ऋतुजा मुठे.

– ऑरेंज बेल्ट
कैवल्य राऊत, गाथा राऊत, तेजस कुंभार

– यलो बेल्ट
विशाल सोनके, प्रज्ज्वल मराठे


Share this Newz