यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) ला आयएसओ २१००१ : २०१८ शैक्षणिक मानांकन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) ला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ २१००१ : २०१८ शैक्षणिक मानांकन (एज्युकेशन स्टॅंडर्ड) प्राप्त झाले आहे.

व्यवस्थापन शास्त्र शाखेतील अशाप्रकारचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारे आयआयएमएस हे पुणे विभागातील पहिली संस्था ठरले आहे.

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आयआयएमएस मध्ये एमबीए व एमसीएच्या विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उद्योगजगतात घडत असलेल्या विविध चालू घडामोडींविषयीचे ज्ञान व माहिती होण्यासाठी विविध औद्योगिक आस्थापनांमधील वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापकांची व्याख्यान सत्रे नियमितपणे घेण्यात येतात. याशिवाय इंडस्ट्रिअल व्हिजिट उपक्रमाद्वारे द्वारे देखील विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांच्या प्रकल्पाला भेटी दिल्या जातात.

तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच. डी. साठीचे संधोधन केंद्र आयआयएमएस मध्ये कार्यान्वित झाले असून आयआयएमएस तर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘यशोमंथन’ या संशोधन पत्रिकेद्वारे व्यवस्थापनशास्त्र विषयाशी संबंधित विविध तज्ञांचे संशोधनपर लेख विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध होतात. दरवर्षी संशोधन विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजनही आयआयएमएस तर्फे करण्यात येते ज्यामध्ये विविध देशातील तज्ञ् संशोधक सहभागी होतात व या परिषदेत शोधप्रबंध सादर केले जातात. याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम), विविवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, दे आसरा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्याने आयआयएमएस च्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध विषयांवर तज्ञांची अभ्यासपूर्ण व्याख्याने, परिसंवाद,थेट उद्योग क्षेत्रातील धोरणकर्त्यांशी संवाद सत्रे, श्रमदान शिबिरे, उद्योजकीय मार्गदर्शन व कार्यशाळा, संस्थेच्या माजी विदयार्थ्यांची मार्गदर्शनपर चर्चा असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातो असे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले.

या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे संस्थेतील अध्यापक वर्ग व अन्य कर्मचारी या सर्वांचा उत्साह वाढीस लागला असून यापुढेही प्रत्येकजण विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवण्यासाठी व विद्यार्थ्यांना ‘यशस्वी’ करण्यासाठी अधिकाधिक योगदान देण्यासाठी कटिबद्ध झाले आहेत.संस्थेला हे मानांकन प्राप्त होण्यासाठी संस्थेचे सर्व अध्यापक वर्ग व अन्य कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे असे मत यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


Share this Newz