द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी व गौरवास्पद असून, आजच्या पिढीला अहिल्यादेवी यांचा खरा इतिहास समजणे आवश्यक आहे. केवळ पुण्यतिथी, जयंती या सारख्या कार्यक्रमांपुरते अहिल्याबाईंचे स्मरण न करता त्यांचे आचार विचार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, नगरसेविका माधवी राजापुरे, उषा मुंडे, उद्योजक माऊली जगताप, स्थायी समिती माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, महेश भागवत, राहुल जवळकर, डॉ. तुकाराम पाटील प्रा. लक्ष्मण हाके, संघाचे मार्गदर्शक सूर्यकांत गोफणे, अभिमन्यू गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे, संघाचे अध्यक्ष अजय दूधभाते आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी व्याख्याते सुनील धनगर यांनी आपल्या व्याख्यानातून अहिल्यादेवींच्या कार्यांचा आढावा घेतला. महापौर माई ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बाबासाहेब चितळकर, सुधाकर सुर्यवंशी, ज्ञानेश्वर वाघमारे, संगिता वाघमारे, मेजर संभाजी गोफणे, डॉ. दिनेश गाडेकर, मारुती काळे आदींचा सन्मान करण्यात आला.
सूर्यकांत गोफणे यांनी प्रास्ताविक केले. गजानन पातुरकर यांनी सूत्रसंचालन, तर मनोजकुमार मारकड यांनी आभार मानले.
शंकर जगताप यांचा विशेष सन्मान
नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ सिंहगड परिसर स्वच्छता व देखभालीसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल उद्योजक शंकर जगताप यांचा संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.







Leave a Review