‘महिंद्रा फायनान्स’तर्फे ‘शुभ उत्सव’ उपक्रम सादर

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, मुंबई : 

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस (महिंद्रा फायनान्स) या भारतातील आघाडीच्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीने (एनबीएफसी) ‘शुभ उत्सव ही विशेष कर्ज योजना आगामी २ महिन्यांसाठी घोषित केली आहे. या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना अत्यंत स्पर्धात्मक व्याजदराने वाहन कर्ज आणि त्यावर ऑफर्स व सवलती देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

शुभ उत्सव हा उपक्रम लगेचच सुरू होत आहे. पुढील दोन महिने, म्हणजे नोव्हेंबरअखेरपर्यंत तो सुरू राहील. यात काही विशेष वित्तयोजनांचा समावेश आहे. त्या संपूर्ण भारतात उपलब्ध असतील. या दोन महिन्यांमध्ये वाहन कर्ज घेण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी खास हा उपक्रम आखण्यात आला आहे.

शुभ उत्सव मोहिमेतून ग्राहकांना अनेक नाविन्यपूर्ण लाभ मिळतील. त्यातील काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

  • एसयूव्ही कर्ज (महिंद्रा ब्रँड) ७.३५ टक्के व्याजदरापासून सुरू
  • शंभर टक्के वित्तपुरवठा
  • कर्जाचा कालावधी ७ वर्षांपर्यंत
  • आता खरेदी करा आणि ६० दिवसांनी पैसे द्या
  • प्रक्रियाशुल्कावर ५० टक्के माफी
  • प्री-ओन्ड (वापरलेल्या) वाहनांवरील कर्जांवर १२ टक्क्यांपासून व्याजदर
  • ट्रॅक्टरच्या उपकरणांवरील कर्जांवर शून्य प्रक्रियाशुल्क
  • कार व ट्रॅक्टर यांच्या कर्जासाठी निवडक ग्राहकांकरीता तिमाही आणि सहामाही ईएमआय

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली असल्याने, ‘महिंद्रा फायनान्स’लादेखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सणासुदीच्या काळात ग्राहक खर्च करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे उत्पादनांच्या खपाचा कल आणि खरेदीची पद्धत यांच्यात सुधारणा झाल्याचेही दिसून येत आहे.


Share this Newz