The Newz Biz Team, नवी दिल्ली
एमपीसी (RBI Monetary Policy Committee (MPC) Meeting) आरबीआय मोनेटरी पॉलिसी कमिटीने व्याजदर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या कमिटीची बैठक ७ ऑक्टोबरपासून सुरू आहे. याबाबत आज अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. काही महत्त्वाचे निर्णय यावेळी आरबीआयद्वारे घेण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास अध्यक्ष असणाऱ्या या सहा सदस्यीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम राहणार आहेत. सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रिव्हर्स रेपो रेट देखील ३.३५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले, की सध्या देशातील आर्थिक आकडेवारीतून चांगले संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचे देखील संकेत मिळत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल विक्रीमध्ये अनेक देशांत रिकव्हरी सुरू झाली आहे. एक्सपोर्टमध्ये देखील अनेक देशात सुधारणा झाली आहे. मार्च तिमाहीमध्ये जीडीपी सकारात्मक होण्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
शक्तीकांत दास यांनी असे म्हटले आहे की, आजघडीला सर्वच क्षेत्रात परिस्थिती सुधारते आहे. अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येण्याची आशा निर्माण झाली आहे. रबी पिकांचे आउटलुक देखील चांगले दिसत आहे. महामारीच्या या संकटात सध्या जास्त नजर आर्थिक सुधारणांवर आहे.
रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम राहणार आहे. रिव्हर्स रेपो रेट देखील ३.३५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सहा सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय दिला. फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत एमपीसी’कडून २.५० टक्के इतकी व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे.







Leave a Review