नाशिक : केंद्र सरकारने सोमवारी कांद्याच्या निर्यातीवर अमर्याद कालावधीसाठी घातलेल्या बंदीमुळे दरात क्विंटल मागे 1000 रुपयांनी घसरण झाली. चांगला दर मिळताच केंद्राने निर्यातबंदी करून अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप केल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिडले आहेत.
कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर नाशिकमधील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी सांगितले, की कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. आता आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणातील कांदा कोठे साठवणार ? नाशकात कांदा 20-25 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. निर्यातीवर बंदी घातल्यास किंमती प्रतिकिलो 2-3 ते रुपयापर्यंत घसरतील. यामुळे उत्पादकांचे नुकसान होईल. असे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
लिलाव पाडले बंद
कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे निर्यात बंदीचा परिणाम पाहायला मिळाला. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या भावात क्विंटल मागे 1000 रुपयांची घसरण झाली. भाव कोसळल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले असून येथील लिलाव बंद पाडण्यात आले.











Leave a Review