True fan : ट्रूफॅनची रणवीर सिंग, करीना कपूर, हृतिक रोशन व टायगर श्रॉफ सोबत भागीदारी

Share this Newz

पुणे : ४.३ मिलियन डॉलर्स उभे करण्यात यशस्वी ठरलेल्या ट्रूफॅन या सेलिब्रेटी फॅन स्टार्टअपने पहिल्या फेरीमध्ये सुपरस्टार्स रणवीर सिंग, करीना कपूर, ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत भागीदारी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे फॅन्सना एक कप कॉफीच्या किमतीमध्ये आपल्या आवडत्या सुपरस्टार्सना भेटण्याची संधी असणार आहे.

ट्रूफॅनमध्ये युजर्सना सहजसोप्या क्विझ खेळायच्या असतात, यातील प्रश्न सेलिब्रेटीजच्या जीवनावर आधारित असतात. भाग्यशाली विजेत्यांना बक्षीस म्हणून त्या स्टार्सकडून व्यक्तिगत संदेश पाठवला जातो.
ट्रूफॅन हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जो ए-लिस्ट सेलिब्रेटींसाठी बिझनेस मॉडेल घेऊन आला आहे, यासारखे दुसरे बिझनेस मॉडेल सध्या बाजारपेठेत उपलब्ध नाही. बॉलिवूड, खेळ, संगीत आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांना यामध्ये सहभागी करवून घेतले जाणार आहे. 

गेमिफिकेशनच्या मनोरंजक माध्यमातून फॅन आणि सेलिब्रेटी यांच्यामध्ये एक अतिशय अनोखे आणि खासनाते निर्माण होणार आहे.  सर्वांना सामावून घेईल आणि आवडीचा ठरेल असा हा प्लॅटफॉर्म असून ट्रूफॅनसोबत पार्टनरशिप करताना मला खूप आनंद होत आहे.  – रणवीर सिंग

 

माझ्या आजवरच्या संपूर्ण कारकिर्दीत चाहत्यांकडून मला प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.  आता मला माझ्या सच्च्या चाहत्यांसोबत व्यक्तिशः संपर्क साधता येणार आहे.  या विचाराने मला खूप प्रभावित केले आणि म्हणूनच मी ट्रूफॅनसोबत पार्टनरशिप केली आहे  – करीना कपूर

 

माझ्या फॅन्सनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि ते मला कायम प्रोत्साहन देत राहतातत्यांच्यासोबत दिल से कनेक्ट होणे मला खूप आवडेलट्रूफॅनमुळे मला  माझ्या चाहत्यांना ती संधी मिळणार आहे.  या प्लॅटफॉर्मसोबत विशेष हातमिळवणी करून माझ्या फॅन्सच्या आणखी जवळ जाता येणार आहे याचा मला खूप आनंद होत आहे.  – टायगर श्रॉफ


 

भारतीय प्रेक्षकांसाठी ट्रूफॅन हा प्लॅटफॉर्म सादर केला जाणे ही अतिशय छान गोष्ट आहे.  ट्रूफॅनसोबत पार्टनरशिपमुळे मला माझ्या सच्च्या चाहत्यांसोबत व्यक्तिगत स्नेह अधिक घट्ट करता येणार आहेदेशभरातील कोणत्याही भागातील चाहते आणि मी एकमेकांशी संपर्क साधू शकणार आहोत.अतिशय नाविन्यपूर्णअनोखा व्हर्च्युअल इंटरफेस प्लॅटफॉर्म ट्रूफॅन निर्माण केल्याबद्दल संस्थापकांचे अभिनंदनमी या लॉन्चसाठी अतिशय उत्सुक आहे. ह्रितिक रोशन

 

ट्रूफॅन चे सहसीईओ निमिष गोयल यांनी सांगितले,  ट्रूफॅनमध्ये आम्ही अशा कोट्यवधी फॅन्सना त्यांच्या आवडत्या स्टार्ससोबत अर्थपूर्ण पद्धतीने कनेक्ट होण्यासाठी मदत करणार आहोत. रणवीर सिंग, करीना कपूर, ह्रितिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्यासारख्या सुपरस्टार्ससोबत हातमिळवणी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कोट्यवधी चाहत्यांच्या अशाच इतर अनेक स्टार्सना यामध्ये सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.


Share this Newz