देहू : आषाढी पायी वारी निमित्त ,ज्ञानोबा तुकाराम या नामाचा जयघोष , टाळ -मृदंग व हरिनामाचा गजरात ,पुंडलिक वरदा ,हरी विठ्ठल ,श्री ज्ञानदेव , तुकाराम च्या गजरात संत तुकाराम महाराज ३४० व्या पालखी सोहळ्याचे पावसाच्या सरींनी ओलेचिंब झालेल्या लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थित गुरुवार ( ता.१९ ) रोजी सकाळी १० : ३० वाजता इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केले.
धार्मिक कार्यक्रम :
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३४० व्या पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त , श्रीक्षेत्र देहूगाव येथील आमदार वाड्यात सकाळी ९ वाजता शासकीय महापूजा , जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विणयकुमार चौबे , पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील , उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने , त्यांच्या पत्नी दैवशाला माने , अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्या पत्नी उज्वला देशमुख ,यांच्या हस्ते संतोष वैध हडपसर ,यांच्या पौरहित्याने संपन्न झाली.यावेळी देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे ,नगरसेविका सपना मोरे , पौर्णिमा काळोखे ,रसिका काळोखे , तसेच देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष ,विश्वस्त ,पालखी सोहळा प्रमुख उपस्थित होते.
शासकीय पूजा झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या पालखी मध्ये ठेवण्यात आल्या , आणि त्याच वेळी ,पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ,ज्ञानेश्वर माऊली तुकाराम , च्या गजरात पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडत असताना जोरदार पाऊसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम दांडगा होता.
नगर पंचायत च्या वतीने दिंडी चालकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष पूजा दिवटे आणि नगरसेवक योगेश काळोखे यांनी दिंडी चालक यांना आरोग्य किट वाटप केले..तर देहूच्या मुख्य प्रवेश द्वार पाशी गेली 24 वर्षे देहू आळंदी विकास समितीचे अण्णा काळोखे, विठ्ठल काळोखे, तुकाराम काळोखे,संदीप शिंदे हे पालखी सोहळ्या वर पुष्पवृष्ठी करत असतात, त्याच बरोबर देहूच्या मुख्य प्रवेश द्वार मद्ये संप्रदायिक भजन मालिका चे आयोजन करत असतात.
सकाळी 11 वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पालखी ची पहिली आरती हजरत अंनगड शाह फकीर यांचे दर्गावर झाली. या वेळी ज्याचे जागेत दर्गा आहे ते किरण बीरदवडे यांनी प्रसादचे वाटप केले, तर दर्गाचे पुजारी मुसूडगे यांनी धूप अंगारा अत्तर गुलाब पुष्पने पालखीचे स्वागत केले..परंपरेमनुसार या अनगडशहा बाबा दर्गा ट्रस्ट च्या वतीने मुसडगे तात्या , बशीर मुलानी , रमजान शेख , फारुख शेख अफझल मुलाणी यांच्या हस्ते श्रीफळ ,उपरणे आसा मानतर पहिली आला.त्यानंतर श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट चे बाळासाहेब काशीद , महादेव बिरदवडे ,विनायक परंडवाल , यांच्या हस्ते आरती करण्यात आली.आरती संपन्न झाल्या नंतर पालखी रथात ठेवण्यात आली. आणि रथ पुढील मुक्काम साठी देहूतून रवाना झाला.
पाऊसाचा जोर कमी जास्त होत होता मात्र वारकऱ्यांचा उत्साह तिसभूर कमी झालेला दिसला नाही..पालखी सोहळा प्रमुख दिलिप महाराज गोसावी इनामदार यांनी सांगितले सुमारे 400अधिकृत दिंडया आणि इतर दोनशे चे आसपास दिड्या अनेक दिंड्या ह्या सामील झाल्या आहेत
अनगडशहा बाबा दर्गा येथील पहिली आरती घेऊन पालखी सोहळा पुढे चिंचोली येथील दुसरा विसावा घेण्यासाठी मार्गस्थ झाला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी दोन च्या सुमारास चिंचोली येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिर या ठिकाणी आला असता , श्री शैनेश्वर मंदिर ट्रस्ट आणि श्री जगद्गुरू प्रतिष्ठान यांच्या वतीने व भाविकांनी पालखी सोहळ्यावर मोठ्या भक्ती भावाने पुष्पवृष्टी केली.त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष दत्राय जाधव ,यांच्या हस्ते संत तुकोबांच्या पादुकांची आरती करण्यात आली.यावेळ रमेश जाधव ,गोविंद भेगडे , संतोष जाधव ,दत्तात्रय लांडगे , बाळासाहेब जाधव ,अरुण जगताप आदी उपस्थित होते. दुसरी आरती घेऊन संत तुकोबारायांचा पालखी सोहळा एक तास या ठिकाणी विसावला.देहूगाव ,चिंचोली व परिसरातील भाविक भक्तांनी दर्शन घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
चिंचोली येथील दुसरी आरती व विसावा घेतल्या नंतर पालखी सोहळा आकुर्डी येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.यावेळी जुना मुंबई पुणे महामार्ग देहू फाटा येथे देखील पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.आयुध निर्माणी फॅक्टरी ,कॅन्टोमेंट बोर्ड ,तसेच इतर संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
वरुण राजाने केले स्वागत
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी इनामदार साहेब वाड्यातून बाहेर आला असता पावसाच्या धारा सुरू झाल्या.यावेळी वारकरी भाविक भक्त ओलेचिंब होऊन आनंदाने वाटचाल करू लागले ,पालखी सोहळा जेंव्हा मुख्य कामनी जवळा आला तेंव्हा पाऊस थांबला.पालखी सोहळा अनगडशहा बाबा दर्गा येथे आला आणि पुन्हा पाऊस पडू लागला.आरती झाली आणि पालखी सोहळा पुन्हा पुढे चालू लागला तेंव्हा पावसाने उघडीप दिली.त्यानंतर पालखी सोहळा चिंचोली येथील दुसर्या आरतीसाठी थांबला असता , आरती चालू होताच पुन्हा पावसाने जोर धरला, आणि पाच ते दहा मिनिटात सर्वत्र पाणीच पाणी केले.
म्हणजे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर जलधारा बरसून वरुण राजनेही या सोहळ्याचे स्वागत केले आणि वारकरी भाविक भक्तांच्या मध्ये एक नवं चैतन्य निर्माण केले.







Leave a Review