पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा

हिंदी-मराठी गीतांचा संगीत रजनी, महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :      पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर – काळे यांना, कलाभूषण पुरस्कार अभिनेते संतोष चव्हाण यांना, कलारत्न पुरस्कार ज्येष्ठ तबला व ढोलकी सम्राट राजू जावळकर यांना, कलादर्पण पुरस्कार अभिनेते नृत्य दिग्दर्शक अर्जुन जाधव यांना, समाजभूषण पुरस्कार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना, तर समाजरत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार उलपे यांनी दिली.

येत्या ७ ऑक्टोबर रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्राची लोकधारा, महिलांसाठी लावणी महोत्सव, नाट्यरंग (हास्यकट्टा), हिंदी-मराठी गीतांचा संगीत रजनी आदी कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमाला नाट्य अभिनेते माधव अभ्यंकर, अभिनेत्री सुरेखा कुडची, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, माजी आमदार उल्हास पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक शंकर जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे, अशोककुमार सराफ, इकबाल दरबार, माणिक बजाज आदी उपस्थित राहणार आहेत.

अन्य पुरस्कारांमध्ये तमाशा कला गौरव पुरस्कार नंदाताई बडे – नगरकर अलकाताई खेडकर निरवींद्र पिंगळे यांना जाहीर झाला आहे. समाजभूषण पुरस्कार आमदार दिलीप मोहिते यांच्या पत्नी सुरेखा मोहिते यांना, समाजसेवक पुरस्कार राजू बनसोडे, अनिल गुंजाळ, अशोक नाईकरे यांना, तर विशेष सन्मान पुरस्कार संतोष रासकर, राजू बंग, सुमन उलपे, आकांक्षा पिंगळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नाटक, लावणी, ऑर्केस्ट्रा, तमाशा, तंत्रज्ञ, ध्वनी-प्रकाश योजना, नेपथ्य या कलाप्रकारातील ज्येष्ठ व नवोदित २५ कलाकारांना कलागौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

याबरोबरच कला गौरव पुरस्कारांमध्ये राजेश डेव्हिड, गीताताई केळकर, चंद्रकांत पवार, अजय अत्रे, सुनील तुंगतकर, सुनील शिंदे, महेंद्र अडसूळ, लक्ष्मीकांत साळवे, प्रदीप खाडे, प्रभाताई महाडिक, हेमा कोरबरी कणसे, दत्ताभाऊ गाडेकर, अनिल मोरे, शिल्पा भवार पांचाळ, अमोल पांढरे, श्रीनाथ गायकवाड, पप्पू धावडे, राहुल जाधव, सुमित पाटील, दशरथ पाचारणे, महेश भांबीड, संगीता केवलानी, रशीद पुणेकर शेख, अभिजीतराजे पुजारी, दिग्दर्शक समीर कश्यप यांना जाहीर झाला आहे.


Share this Newz