द न्यूज बिज् टीम, पुणे : विश्वभूषण, बोधीसत्व, भारतरत्न, प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समिती – सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कँप व आदियाल स्पोर्ट क्लबच्या वतीने संविधान वाचन करून संविधानदिन साजरा करण्यात आला.
भीम चौक व सृष्टी चौक येथे पिंपळे गुरव येथे झालेल्या कार्यक्रमास माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, युवा नेते तानाजी जवळकर, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शाम जगताप, 125 संयुक्त जयंतीचे पदाधिकारी व सदस्य राहुल काकडे, ऍड. राजेश नितनवरे, कैलास बनसोडे, चंद्रकांत वाकोडे, धम्मरत्न गायकवाड, अतुल काशीद, गणेश जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, उद्योजक मानसिंग आदियाल, उद्योजक महेंद्रसिंग आदियाल, प्रीतम आदियाल, रंजना साळवे, युवा नेते अमरसिंग आदियाल, ऍड. विलास गायकवाड, सुनिल कांबळे, रविंद्र कांबळे, सी.आर.गायकवाड, गजानन कांबळे, भालशंकर, मोहन कांबळे, नाना धेंडे, राजेंद्र डोनोलीकर, सुरेश सकट, इंदुमती पवार आदी उपस्थित होते.
शोभाताई आदियाल यांनी सांगितले, की भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे.







Leave a Review