The Newz Biz Team, NEW DELHI
तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याने सद्यस्थितीला अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर चालली चालली आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबानने दिली आहे. पण आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारताने दोन विमाने काबुलला पाठवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आपली भूमिका थोड्याच वेळात जाहीर करणार असल्याचे समजते.
‘काबुलमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही दोन विमानं सज्ज ठेवली आहेत. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत,’ असे एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. काबुलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे रात्रीपासून हवाई वाहतूक बंद आहे. एअर इंडियाचं एक विमान दररोज काबुलसाठी उड्डाण करते.







Leave a Review