The Newz Biz Team, PUNE
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे 10 वीचे विद्यार्थी परीक्षा न देताच थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात 1 जून रोजी पुनर्विचार करून निर्णय घेतला जाणार असून, परीक्षा घेण्यात येणार असतील, तर 15 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे.
देशभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या मे महिन्यात होणार होत्या. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्याने परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले जात होते. आता यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
- निर्णयावर असमाधानी विद्यार्थ्यांना देता येईल परीक्षा
जे विद्यार्थी आपल्या निकालावर असमाधानी नसतील, त्यांना परीक्षेची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर घेण्यात येतील.
- स्टुडंट असोसिएशनने केली होती परीक्षा रद्दची मागणी
CBSE च्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा 4 मे रोजी घेतल्या जाणार होत्या. परंतु, ऑल इंडिया स्टूडंट एसोसिएशनच्या वतीने या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. संघटनेकडून शिक्षण विभागाला पत्र देखील पाठवण्यात आले होते. तसेच सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी #CancelBoardExam2021 हॅशटॅगसह कॅम्पेनही चालवले.
- महाराष्ट्रात आधीच माध्यमिक परीक्षा रद्द
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय अगोदरच घेतला आहे.







Leave a Review