The Newz Biz Team, PUNE
करमाळा तालुक्यातील पांडे येथील कमला भवानी शुगर लि. च्या गाळप हंगामाची यशस्वी सांगता करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन विक्रम शिंदे, डायरेक्टर जनरल डांगे साहेब, आदिनाथ सहकारी कारखान्याचे अध्यक्ष वामन पदे, संचालक तानाजी झोळ, युवा नेते सुनील सावंत, सूजित बागल, विनय नन्नवरे, मानसिंग खंडागळे, तात्या सरडे, राजेंद्र पवार, महावीर साळुंके, आप्पासाहेब चौगुले, हनुमंत वायसे, कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. गिरमे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वाहनचालकांचा आदर सत्कार करून गाळप हंगामाची सांगता करण्यात आली.
श्री. डांगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कारखान्यासमोरील अडचणी सांगून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. पुढील वर्षी कारखान्याचे एक्सपान्शन करून हा कारखाना 6000 टेनेज करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
विक्रम शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले, की संपूर्ण महाराष्ट्रात 265 उसाच्या जातीमुळे उतार कमी मिळाला. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीमध्ये 86032, 8005, 434, 10005 अशा उसाची लागवड करावी. आम्ही तो गाळपासाठी लवकरात लवकर देऊ असे सांगितले. कारखान्याच्या चालू गळीत हंगाामामध्ये 4,70,655 एवढे गाळप झाले असून,4,18,000 पोती साखर उत्पादन केले आहे.
सहविज निर्मिती प्रकल्पातून २ कोटी ५६ लाख ७५ हजार ९५० युनिट एवढी वीज निर्मिती केली आहे. पुढील काळात डिसलरी प्रकल्प उभा करण्याचा आमचा मानस असून, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सर्वात जास्त ऊस उत्पादक शेतकरी, वाहनमालक, तोडणी मुकादम यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदाळे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन कारखान्याचे जनरल मॅनेजर गिरमे, चिफ इंजिनीयर चौगुले, प्रोसेस मॅनेजर पाटील, अकाउंट ऑफिसर उबाळे, मुख्य शेती अधिकारी जगदाळे, शेती अधिकारी पाटील, प्रशासकीय अधिकारी जगताप, लेबर ऑफिसर बागल, परचेस ऑफिसर कोयले, स्टोअर विभागाचे सय्यद, इंजिनिअर मिसळ यांनी केले.







Leave a Review