‘मदर्स रेसिपी’चा देसी शेझवानसोबत सॉस कॅटेगरीत प्रवेश

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

शेझवान चटणी या इंडो-चायनीज फ्यूजन सॉसने भारतातील स्वयंपाक घरांत  स्वत:ची जागा पटकावली आहे. केवळ मसाल्याचा पदार्थ, या पलीकडे शेझवान चटणीने आपला रुबाब कायम ठेवलेला दिसतो. या चटणीची चव इतकी निराळ्या ढंगाची आहे की, ती मिसळताच वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत द्विगुणीत होते. घरा-घरांतील शेफ आता फ्यूजन चवीचा झटका घरगुती जेवणाला सहज देऊ शकतात. मदर्स रेसिपीने त्यांच्या ‘रेसिपी’ या सबकॅटेगरीत ‘देसी शेझवान चटणी’ अलीकडेच लॉन्च केली आहे. या उत्पादनामुळे ब्रँडची आंतरराष्ट्रीय अन्नपदार्थ आणि ग्लोबल क्यूझीनमधील प्रवेश अधोरेखित होतो.

इंडिया चायनीज, हॉट अँड बीबीक्यू सॉसेस मार्केट आऊटलूक, 2003 अनुसार भारतातील चायनीज, हॉट अँड बीबीक्यू सॉसेस’च्या एकंदर बाजारपेठेचे निरीक्षण नोंदवण्यात आले. 2022-23 पर्यंत चायनीज, हॉट अँड बीबीक्यू सॉसेस वर्गवारी 700 कोटींहून अधिकचा आकडा गाठणार आहे. विविध खाद्यप्रकारांना भारतीय खवय्यांकडून स्वीकारले जाते आहे. ज्यामुळे विक्रीत वाढ झाली, सॉस अगदी सहज उपलब्ध होऊ लागले आणि अशा अनेक घटकांमुळे पुनरावलोकन कालावधी 2011-12 ते 2016-17 दरम्यान बाजार 15% सीएजीआरने वाढला. चायनीज सॉसमध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, व्हिनेगार, सोय सॉस आणि शेझवान चटणीचा समावेश असतो. सध्या एकंदर चायनीज सॉस मार्केटचा अंदाज नोंदवायचा झाल्यास हा वाटा 25% नी वाढलेला आहे. तसेच आगामी पाच वर्षांत यामध्ये आणखी वृद्धी होण्याचा अंदाज आहे.

रेसिपी ब्रँडची देसी शेझवान चटणी ही मिरची, आलं, लसूण आणि कांदा अशा मसाल्यांची चांगली चव देते. जी तुमच्या जिभेचे चोचले पुरवते. तुम्ही या चविष्ट चटणीचा वापर अगदी सगळ्याच पदार्थांमध्ये करू शकता. ही चटणी डीप किंवा स्टरफ्राय म्हणूनही वापरता येते, ती भात, न्यूडल्स किंवा पनीर अथवा चिकनला लावून ठेवण्याचा मसाला म्हणूनही वापरता येते.

या उत्पादनाविषयी बोलताना मदर्स रेसिपी’च्या कार्यकारी संचालिका संजना देसाई म्हणाल्या की, रेसिपी सॉसेची आमच्या अन्नपदार्थ उत्पादनांमध्ये नव्याने भर पडली आहे. आम्ही या लॉन्चसोबत आंतरराष्ट्रीय चवींची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जेवणाची लज्जत निश्चितच वाढेल. रेसिपी हा ब्रँड तरूण आहे. जो तुम्हाला खुमासदार चवीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देतो आणि खाद्यसंस्कृती समृद्ध करतो. रेसिपी सॉस’समवेत ग्राहकाला स्वयंपाकाचा उत्साह आणि स्वातंत्र्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

रेसिपी शेझवान चटणी ही आकर्षक, हल्लीच्या ट्रेंडी आणि नजर वेधून घेणाऱ्या 250 ग्राम पॅकिंग बाटलीत उपलब्ध आहे. हे उत्पादन सध्या मुंबई, पुणे, बंगळूरू, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या शहरांमध्ये उपलब्ध असून लवकरच अन्य शहरांमध्ये लॉन्च होणार आहे.


Share this Newz