शापूरजी पालोनजीने पुण्यात लाँच केला सर्वांत मोठा रिअल इस्टेट प्रकल्प

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट या भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह रिअल इस्टेट ब्रॅण्डने त्यांच्या नवीन रिअल इस्टेट प्रकल्पाची घोषणा केली आहे. पुण्याच्या पश्चिम भागात बावधनजवळ हा प्रकल्प आकाराला येणार आहे. ‘वनाहा’ नावाचा हा प्रकल्प 148 एकर जागेत पसरलेला आहे. हा प्रकल्प संमिश्र वापर विकास (मिक्स्ड यूज डेव्हलपमेंट) प्रकारचा असेल आणि भारतातील सर्वांत मोठ्या टाउनशिप्सपैकी एकीचा हा भाग असेल.

ही अव्वल दर्जाची मिक्स्ड यूज डेव्हलपमेंट टप्प्याटप्प्यांमध्ये कार्यान्वित होणार असून, प्रकल्प पूर्णत्वास जाईल तेव्हा त्यामध्ये 6000 हून अधिक अपार्टमेंट्स असतील. पहिल्या टप्प्यात 1, 2 आणि 3 बीएचके सदनिकांचा समावेश असलेली व विविध युनिट कन्फिगरेशन्सची 600 हून अधिक अपार्टमेंट्स असतील. या सदनिका 39 लाख ते 89 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत.

अत्यंत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेल्या या प्रकल्पात 90 एकर जागा मोकळी ठेवली जाणार आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये डेडिकेटेड अत्याधुनिक क्लबहाउस, स्विमिंग पूल, किड्स प्ले एरिया, गार्डन वॉकवे, सायकलिंग ट्रॅक यांचा समावेश असेल. संपूर्ण टाउनशिपमध्ये व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा, रिटेल दुकाने, खेळाची मैदाने, शाळा, अग्निशमन केंद्र व रुग्णालय आदी आस्थापने असतील. 148 एकर जागेमध्ये हिरवाई आणि प्रसन्न वातावरण यांचा परिपूर्ण समतोल साधला जाईल. हा भाग शहराच्या मध्यवर्ती भागाशी अखंडित वाहतूक साधनांनी जोडलेला असेल.

वेंकटेश गोपालकृष्णन (मुख्य कार्यकारी अधिकारी, शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट) प्रकल्प लाँच करताना म्हणाले, “पुणे ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये आमचे अस्तित्व पक्के करण्याच्या आमच्या धोरणामध्ये हा मोठा प्रकल्प चपखल बसतो. सध्याची परिस्थिती बघता, ग्राहकांना घरखरेदीतील त्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी विश्वासार्ह ब्रॅण्ड्सकडून ग्वाही हवी आहे आणि वनाहा ग्राहकांच्या दर्जेदार जीवनशैलीच्या अपेक्षा नुसत्या पूर्णच करणार नाही, तर त्यापलीकडे कामगिरी करेल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”


Share this Newz