The Newz Biz Team, Pune
आज सर्वत्र कोरोनाचे संकट असताल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू लोकांना पुण्यातील येरवडा येथील “त्रिरत्न माणूसकी केंद्रा”ने मदतीचा हात दिला असून, त्यांना अन्नधान्यासोबत प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या वाटप करण्यात आल्या आहेत.
त्रिरत्न माणूसकी केंद्र हे अनेक वर्षांपासून आपली जबाबदारी मोठी आहे, या सामजिक भाावनेने कार्य करीत आहे. कोरोना काळामध्ये अनेक गरीब व गरजू लोकांपर्यंत मदतीचा हात घेऊन जात आहे. संथेचे कार्य हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचविणे, सोबत वंचित घटकांना मदत करणे हे सामजिक जाणीव ठेवून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. करोना महामारीमुळे अनेक लोकांचे काम गेलेले आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेेली असताना माणुसकी संस्थेने लोकांच्या घरापर्यंत गरजेच्या वस्तू, अन्नधान्य व मास्क पुरविले आहेत.
येरवडा, मुंढवा, ताडीवाला रोड, बोपोडी, दापोडी, तसेच पुण्याबाहेर शिरूर, तळेगाव येथील भटक्या विमुक्त लोकांपर्यंत मदत पोहोचविली आहे. कळमेश्वर येथील १२ अंध परिवारला धान्य वाटप केले. करोना संकटाचा वाढता प्रभाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून १००० पेक्षा जास्त येरवडा येथील कुटुंबियांना आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथिक औषध वाटण्यात आले. ससून रुग्णालयातील अधिकारी मा.कांबळे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शन घेऊन लोकांना मदत करीत आहे.
संस्थेचे धम्मचारी विवेकमित्र यांनी सांगितले, की जे जे मदतीसाठी आले, ते परत जाणार नाही, याची काळजी घेत आत्तापर्यत १६०० कुटुंबीयाना माणुसकी संथेने मदत केली आहे. संथेचे इतर उपक्रम आहेत. संस्थेचे संस्थापक धम्मचारी लोकमित्र व मैत्रेयनाथ यांच्या मार्गदर्शनातून मोफत वाचनालय गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरु आहे. तसेच मोफत ध्यानसाधना वर्ग, सामाजिक प्रशिक्षण गेल्या अनेक वर्षापासून नियमित सुरु आहे.







Leave a Review