नवी दिल्ली : नुकतीच विविध क्रिडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महिला रेसलिंगमध्ये देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देणारी साक्षी मलिक अर्जुन पुरस्कार न मिळाल्यामुळे नाराज झाली आहे. यावरुन साक्षीने मोदींना विचारले की, असे कोणते पदक जिंकून येऊ, जेणेकरुन मला अर्जुन पुरस्कार मिळेल ?
साक्षीने यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला होता. क्रिडा मंत्रालयाच्या स्पेशल कमेटीने 29 खेळाडूंसह साक्षीच्या नावाची शिफारस केली होती. परंतू, अंतिम यादीतून साक्षीचे नाव हटवण्यात आले.यामुळे नाराज झालेल्या साक्षीने ट्वीटद्वारे थेट पंतप्रधानांना सवाल केला आहे.
मीराबाई चानूचेही नाव यादीतून हटवले
2018 मध्ये भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूला खेळरत्न मिळाला होता. त्यामुळे तिचेही नाव अर्जुन अवॉर्डच्या फायनल लिस्टमधून हटवण्यात आले आहे.










Leave a Review