युवा नेते प्रसाद कोलते यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांच्या यमुनानगर, निगडी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, युवक प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक नाना काटे, प्रशांत शितोळे, माजी नगरसेविका सुमनताई पवळे, प्रदेश युवक उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी शहर कार्याध्यक्ष शाम जगताप, युवक शहर उपाध्यक्ष मयूर जाधव, शहर युवक सरचिटणीस प्रतीक साळुंखे, अक्षय माछरे, सुनील राणे, कुणाल साने, तानाजी खाडे, शशीकिरण गवळी, राजू खाडे, अनिल भोसले, विवेक गवळी, रमेश निकाळजे, सोमनाथ कदम, डिगा उदयकुमार, शमाकांत नांगरे, राजेश भगत, निखिल दळवी, ओमकार पवार तसेच महिला, युवक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, की प्रसाद कोलते यांनी यमुनानगर, निगडी तसेच शहर पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविला असून, यापुढेही समस्या सोडविण्यासाठी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आहोत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध योजना व प्रभागातील विविध कामे करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची गरज आहे, ती गरज ओळखून प्रसाद कोलते यांनी एक चांगले सुसज्ज कार्यालय तयार केले आहे. यमुनानगर, निगडी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय खऱ्या अर्थाने जनसेवेचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करीत पवार यांनी यावेळी प्रसाद कोलते आणि प्रियाताई कोलते यांच्या कार्याचे कौतुक केले.
प्रसाद कोलते म्हणाले, की पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून स्थानिक पातळीवर काम करत असताना, एक छोट्याश्या कार्यालयाची गरज भासत होती. अजित पवार यांनी आमच्या कार्याचे कौतुक केल्याने नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. स्थानिक पातळीवर असेच सक्रिय राहून येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजून बळकटी देणार आहे.

 ‘दादां’ची क्रेझ…

महाराष्ट्राचे ‘दादा’ म्हणून अजित पवार सर्वांना परिचित आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांची युवा कार्यकर्त्यांत मोठी क्रेझ आहे. अजित पवार यांच्या कामाची पद्धती, शिस्त, तसेच कामाचा उरक या बाबींमुळे युवा कार्यकर्त्यांची संख्या त्यांच्या सोबत अधिक असते. आजच्या कार्यक्रमातही युवकांची संख्या मोठी होती. दादांची क्रेझ कायम असल्याचीच ही पावती आहे.


Share this Newz