पुण्यात आज असोसिएशन ऑफ शलाकी तर्फे वैद्यकीय परिषदेचे आयोजन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्य तर्फे सिनर्जी 2022 अंतर्गत आज शनिवार (दि.30) एप्रिल आणि उद्या रविवार (दि.1) मे अशा दोन दिवस वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते आज (शनिवार) सकाळी 11 वाजता होणार आहे.

ही परिषद पुण्यातील राजा बहादूर मिल रोड, संगमवाडी येथील हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये होणार आहे. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देताना नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजीत आग्रे म्हणाले” देशभरातील 600 डाॅक्टर या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये नेत्ररोग तज्ञ, आयुर्वेदातील कान- नाक- घसा या डॉक्टरांची ही परिषद आहे” .

या परिषदेमध्ये आधुनिक पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्म्याचा नंबर घालविणे, काचबिंदू, डोळ्याच्या पडद्याचे विविध आजार यासह विविध विषयांवर दोन दिवसामध्ये चर्चासत्र होणार असल्याची माहिती डॉ. आग्रे यांनी दिली.


Share this Newz